Sukanya Samruddhi Yojana:20हजार जमा केल्यानंतर मिळतील 9 लाख 23 हजार रुपये 

 

Sukanya Samrudhi Yojana: 20हजार जमा केल्यानंतर मिळतील 9 लाख 23 हजार रुपये

Sukanya Samrudhi Yojana: भारत सरकारच्या माध्यमातून मुलींसाठी मुख्यतः सुकन्या समृद्धी योजना चालू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत आई-वडील आपल्या मुलीच्या नावे बॅंकेत खाते उघडून गुंतवणूकीची सुरूवात करू शकता.

या योजनेच्या माध्यमातून 10 वर्षांच्या आतील मुलीचे खाते उघडले जाते.आणि गुंतवणूकीची सुरूवात करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना  

या योजनेंतर्गत जे लाभार्थी खाते उघडू इच्छितात त्यांच्या मा हितीसाठी सांगतो की या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, मुलीचे शिक्षण आणि लग्न चांगल्या रीतीने आणि धामधूमीत व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत 8.2% व्याज देण्यात येते.

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता

तुम्ही आपल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून पैसे जमा करु इच्छित असाल तर ,

  1. तुम्ही भारतीय नागरिक असायला हवे.
  2. कुटुंबातील दोन मुलींच्या नावे या योजनेत खाते उघडू शकता.
  3. तुमच्या मुलीचे वय हे 10 वर्षांच्या आत असायला हवे.
  4. तुम्हाला 15 वर्ष पैसे जमा करावे लागतील.

किती गुंतवणूक करू शकता

या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर पैसे भरू शकता.आणि मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिचे नावे जमा झालेले पैसे काढू शकता.

या योजनेंतर्गत तुम्ही एका वर्षात कमीत कमी 250 रू गुंतवणूक करू शकता.जास्तीत जास्त वार्षिक 1.50 लाखांची मर्यादा आहे.

20000 हजार गुंतवणूकीतून इतकी रक्कम मिळेल.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही महिना 1666 रू जमा केले तर तुमची वार्षिक गुंतवणूक 20000 रुपये होते.

शेवटपर्यंत तुमची गुंतवणूक 300000 रुपये होईल.त्याचे मिळणारे व्याज हे 623677 रुपये मिळेल.

मॅच्यूअरीटी नंतर तुम्हाला व्याज आणि गुंतवणूक केलेली रक्कम मिळवून एकूण 923677 रुपये मिळतील.

Leave a Comment