Maharashtra election news: शरद पवार से मेरा बैर नही समरजित तेरी खैर नही. हसन मुश्रीफ यांची वल्गना

Maharashtra election news: शरद पवार से मेरा बैर नही समरजित तेरी खैर नही. हसन मुश्रीफ यांची वल्गना

शरद पवारांनी कागल मध्ये सभा घेऊन समरजीत सिंह घाटगे यांना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश दिला आहे. यावरून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की समरजीत सिंह आणि आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.

कागल मतदार संघातील सर्व लोकांना अशा शेतकऱ्याला आहे की जर ते समरजित सिंह घाडगे यांना निवडून देतील किंवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तर त्यांना पुढे आमदार न ठेवता मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. यावरून असे स्पष्ट दिसत आहेत की समरजीत सिंह घाडगे यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते तसा स्पष्ट इशारा शरद पवारांनी दिला आहे.

यावर त्यांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधताना म्हटले की जनता हा पळपुटपणापणा नक्कीच लक्षात ठेवेल. आणि जनता नेहमीच समरजीत सिंह घाडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा ठाम विश्वास शरद पवारांनी बोलून दाखवला आहे.

हसन मुश्रीफ बेबसपणे गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये दाखल झाले असल्यामुळे कागलच्या जनतेला हे मान्य नाही. असे देखील शरद पवारांनी म्हटले आहे. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे ती समोरच्या घाडगे यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील आणि हसन मुश्रीफांचे आव्हान मोडून काढतील.

यावर हसन मुश्रीफ साहेबांनी पलटवार केला आहे की शरद पवार से मेरा कोई बैर नही समरजीत तेरी खैर नही अशी डायलॉग बाजी करून जशास तसे उत्तर दिले आहे. यावर त्यांनी असे म्हटले की माझ्यासारख्या अल्पसंख्यांक उमेदवारावर शरद पवार साहेबांची एवढी नाराजी का आहे मी एकटाच अजित पवार वर गेलो होतो इतर 40-45 जण सुद्धा होते परंतु शरद पवार साहेब मला अल्पसंख्यांक म्हणून निशाणा करत आहेत.

राज्याचे राजकारणाचा विचार करायचा झाल्यास हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे ही लढत निश्चित मानली जात आहे. चार ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेले हसन मुश्रीफ यांचे पारडे या मतदारसंघांमध्ये जड मानले जात आहे. आता कागलच्या मतदारसंघातील जनतेवर या सर्वांचा निकाल अवलंबून आहे असा स्पष्ट संकेत शरद पवार साहेबांनी दिला आहे. शरद पवारांनी समरजीत सिंह घाडगे यांना मंत्रीपदी घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी भावनिक साद कागलकरांना घातल्याची दिसून येत आहे

Leave a Comment