शरद पवारांनी केले नितीन गडकरी यांच्या कौतुक सर्वांच्या भुवया उंचावल्या 

शरद पवारांनी केले नितीन गडकरी यांच्या कौतुक सर्वांच्या भुवया उंचावल्या

नितीन गडकरी साहेबांनी मालवण घटने संबंधित बोलताना स्पष्ट केले आहे की समुद्रातला कोणतीही वास्तू किंवा मूर्ती उभा करायची असेल तर त्यामध्ये स्टेनलेस स्टील वापरणे अत्यंत गरजेचे असते .परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये अशा प्रकारचे स्टेनलेस स्टील चा वापर केला गेला नाही. जर या मूर्तीमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर केला गेला असता तर मूर्तीला कधीही धोका निर्माण झाला नसता. कारण स्टेनलेस तीनला कोणत्याही प्रकारचा गंज लागत नसल्यामुळे त्याचा वापर करायला हवा होता.

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पहिल्यापासून विविध पक्षांमध्ये राजकारण पाहायला मिळत आहे. विविध पक्षातील लोक एकमेकांवर आरोप दोषारोप करत आहेत. हे आरोप थांबायला तयार नाहीत. यामध्येच नितीन गडकरींचे हे स्पष्टीकरण खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. दिल्लीमधील एका कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

त्यांनी बोलताना पुढे म्हणते की समुद्रकिनारी बांधल्या जाणाऱ्या सर्व बांधकाम वर किंवा पुलावर जास्तीत जास्त स्टेनलेस स्टीलचा वापर कसा होईल. स्टेनलेस स्टील वापरल्यामुळे वास्तूला कोणताही धोका निर्माण होत नाही.

त्यांनी उदाहरणाचा देखील दाखला दिला त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये त्यांनी 55 उड्डाणपूल बांधले आहेत. त्यात त्यांनी जास्तीत जास्त स्टेनलेस स्टील पावडरचा उपयोग केला गेला आहे याची खातरजमा केली आहे. असे तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना सांगितले. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार जर स्टेनलेस स्टीलचा वापर जास्तीत जास्त केला गेला तर तो गंजा पासून बचाव होऊ शकतो.

आता तर गडकर यांचे स्पष्ट मत झाला आहे की समुद्रकिनाऱ्यावर कोणतेही बांधकाम असले तरी ते जास्तीत जास्त स्टेनलेस स्टीलचा वापर जास्त करणार आहेत. जर छत्रपतींच्या मूर्तीला स्टेनलेस स्टीलचा वापर केला गेला असता तर ती घटना कधीच घडली नसती असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

या वक्तव्यावरून शरद पवारांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी जर नक्कीच जाणकारांचे मत घेतले असावे असे देखील शरद पवार साहेबांचे स्पष्ट मत आहे. ते एक अभ्यासू मंत्री असल्यामुळे त्यांनी नक्कीच एखाद्या जाणकार व्यक्तीचे मत घेतले असावे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तिकार जयदीप आपटे यांच्या विरोधात पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली आहे. ही नोटीस म्हणजे तो संबंधित व्यक्ती परदेशामध्ये पळून जाऊ नये यासाठी असते.

 

Leave a Comment