Supriya Sule: सुषमा स्वराज माझ्या गुरु सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
सुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या असून त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पुढे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा होऊ घातले यावर त्यांनी म्हटले आहे की विधानसभेमध्ये भाजपाचे सरकार येणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यांना आपल्या कार्याबद्दल संसद रत्न पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेले आहे एका अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आधीच म्हटले आहे की राष्ट्रवादी या शर्यतीमध्ये कुठेही नाही. मुख्यमंत्री हे काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे सुद्धा होऊ शकतात.
एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की आमची पार्टी मुख्यमंत्री पदाबाबत अपेक्षा करत नाही. आमच्या पडला फक्त भाजपची सत्ता खेचून या विधानसभेवर महाविकास आघाडीची सत्ता आणायचे आहे. पत्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी असे म्हटले की त्यांना मुख्यमंत्री पदा बाबत कोणताही रस नाही
महाराष्ट्रातील विविध विविध घडलेल्या घटना म्हणून मुळे महाराष्ट्रातील कायदे व्यवस्थेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याबरोबर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देखील मागितला आहे. त्यांच्या राज्यामध्ये महिला या सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी राजीनामा मागितला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची घटना झाल्यानंतर त्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
सुषमा स्वराज या माझ्या गुरु
त्यांनी पुढे असे म्हटले की भाजपा हा पक्ष पहिल्यासारखा राहिलेला नाही त्यामध्ये खूपच बदल घडलेले आहेत. पूर्वी भाजपमधील नेत्यांमध्ये आमचे जरूर मतभेद व्हायचे परंतु आमचे विचार हे एक होते विचारात मतैक्य असायचे. स्वर्गीय सुषमा स्वराज यांना मी गुरुस्थानी म्हणत असायचे. परंतु अशा नेत्यांची आज खूपच कमी मध्ये जाणवते.
काँग्रेसने मागणी केलेल्या जातीय जनगणनेवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या पक्षाचे म्हणणे सुद्धा आहे की जातीय जनगणना व्हवी आरएसएसला देखील राज्यात जातीय जनगणना व्हावी असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करते.
कंगना राणावत बद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असे म्हटले की मला याबद्दल काहीच माहिती नाही मी माहिती घेऊन बोलेल. परंतु त्यांनी महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्य सरकारने महिला सुरक्षा बद्दल कठोर पावले उचलावी असे त्यांनी मागणी केली आहे.