सोलापूर चे डाळिंब पोहचले दुबईत तीन एकर शेतीतून मिळाले कष्टाचे फळ

सोलापूर चे डाळिंब पोहचले दुबईत तीन एकर शेतीतून मिळाले कष्टाचे फळ

Pomegranate Farming Solapur: नोकरीच्या मागे न लागता आजकाल शेती मधून नोकरी पेक्षा जास्त उत्पन्न काढून काळी आईच्या सेवेचं भाग्य मिळवत आहेत.असेच एक शेतकरी आहेत सोलापूर चे बंडू हरिदास शिंदे . त्यांचं मूळ गाव निमगाव टेंभुर्णी.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील हे गाव आहे.

जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करून त्यांनी ही कमया करून दाखवले आहे. आपल्या डाळिंबामध्ये उच्च गुणवत्ता तयार करण्यासाठी त्यांनी जैविक निविष्ठांचा वापर वाढवल्यामुळे त्यांना आपले डाळिंब दुबई निर्यात करणे शक्य झाले. नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेणे हे एक उत्तम उदाहरण बंडू शिंदे यांनी आपल्या डाळिंब शेतीच्या माध्यमातून युवकासमोर ठेवले आहे.

52 लाखांचे उत्पादन

बंडू हरदास शिंदे यांना आपल्या तीन एकर डाळिंब शेतीतून निर्यातीमधून जवळजवळ 52 लाखांचे भरघोस उत्पादन मिळाले आहे हे शक्य झाले केवळ नियोजनबद्ध शेती आणि सेंद्रिय निविष्ठांचा योग्य वापर. सेंद्रिय निवासस्थान चा वापर केल्यामुळे त्यांच्या डाळिंबाला प्रति किलो विक्रमी 180 रुपये किलोचा दर दुबईतील व्यापाऱ्यांनी दिला. त्यांच्या फळाची गुणवत्ताही उच्च दर्जाची होती त्यामुळे एवढा दर भेटणे त्यांना शक्य झाले.

एक झाड देते प्रति किलो 20 किलो फळ

बंडू शिंदे हे मूळचे टेंभुर्णी येथील असून त्यांनी शिराळ येथील जमीन खरेदी केल्यानंतर त्यांच्या जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला त्यामुळे त्यांच्या डाळिंब उत्पादनात त्यांना सरासरी प्रति झाड वीस किलो चा अवरेज भेटला. त्यांच्या फळांची गोडी आणि चकाकी ही खूपच उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांना दर उत्तम भेटल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

सरासरी फळाचे वजन 200 ते 400 ग्रॅम

बंडू शिंदे यांना अगर तीन एकर डाळिंब शेतीतून 29 टन डाळिंब निर्यात केले. दर्जा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांच्या प्रति फळाचे वजन हे दोनशे ते चारशे ग्रॅम च्या दरम्यान भरले त्यामुळे त्यांचे सरासरी एकराचा आवरेज वाढून आला. त्यांना प्रति एकरी सेंद्रिय  आणि रासायनिक खतांचा मिळून अडीच लाख रुपये खर्च आला असा तीन एकराचा खर्च बघायचा झाला तर साडेसात लाख रुपये झाला.

डाळिंब शेतीचे नियोजन

सुरुवातीला त्यांनी प्रति झाड एक किलो शेणखत बरोबर रासायनिक आणि जैविक खतांचा मिसळून डोस दिला जैविक खतामुळे आणि शेण खतामुळे जमिनीची गुणवत्ता वाढून ती कसदार होण्यास मदत होते असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या वाढण्यास मदत होते. यामुळे जमिनीतील मर रोगावर व इतर सुद्धा अटकाव होतो.

 

 

Leave a Comment