लालबागच्या चरणी 15 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अंबानी कुटुंबाकडून अर्पण

लालबागच्या चरणी 15 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अंबानी कुटुंबाकडून अर्पण

गणेश उत्सव मुंबईमधील सर्व गणेश मंडळी आपली तयारी पूर्ण केलेली असून मुंबईमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा आणि मानाचा गणपती म्हणजे लालबागचा राजा असून. या गणेशोत्सव चा उत्सव हा तितकाच मोठा आणि दिमाखदार असतो. लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाचे हे 91 व वर्ष आहे.

मुंबईमध्ये गणेशोत्सव म्हटले की लालबागचा राजा हा प्रथम स्थानी मानला जातो. हा गणपती मानाचा असून या गणपतीपुढील आरास मंडप छत तसेच याचे देखन रूप देखील सर्वांची आकर्षण असते. या गणपतीसमोर यंदा अंबानी कुटुंबांनी वीस किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला असून याची किंमत ही 15 ते 16 कोटीच्या दरम्यान असल्याचे बोलले जात आहे या मुखटामुळे या गणपतीची देखणी रूप अधिक दिसू लागले आहे. गुरुवारी या गणपतीची पहिली झलक पाहावयास मिळाली असून यावेळेस मंडळाचे आणि  पदाधिकारी उपस्थित होते.

लालबागचा राजा देश विदेशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा हा गणपती मानाचा म्हणून ओळखला जातो. याचे दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक रांगेमध्ये तासनतास उभे राहून दर्शन घेत असतात तसेच अनेक सेलिब्रिटी बॉलीवूड स्टार देखील तसेच राजकारणी मंडळी या राजाचे दर्शन घेत असतात.

एक महिन्यापूर्वीच अंबानी कुटुंबामध्ये मोठा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला होता त्यानंतर एका सर्वसाधारण सभेमध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की लालबागचा राजाच्या विश्वस्त मंडळावर अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंबानी कुटुंबाचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातले योगदान पाहता त्यांनी लालबागच्या राजाला वीस किलो आणि पंधरा ते सोळा कोटी किमतीच्या मुकुट अर्पण करण्याची घोषणा केली.

यंदा लालबागच्या राजाच्या गणपतीचे वाहन हे मयुरासन आहे मयूर आसनावर विराजमान लालबागच्या राजाची एकच झलक पाहताच भक्तमडळामध्ये मोरया मोरया अशा घोषणा निनादू लागल्या.

महिनाभर पूर्वीच विवाह सोहळा पार पडल्यानंतर एक धार्मिक कार्यक्रमांमधील आपले योगदानासाठी त्यांनी अंबानी कुटुंबाकडून २० किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण केल्याचे बोलले जात आहे.

हा मुकुट तयार करण्यासाठी कारागिरांना दोन महिने लागले असून यासाठी वीस किलो सोने वापरण्यात आला आहे याची किंमत पंधरा कोटी एवढी आहे. तसेच गणेशोत्सव मंडळाकडून काशी विश्वनाथ या थीमचा देखावा सादर करण्यात आला आहे. काशी विश्वनाथ रूपातील देखाव्ध्ये या लालबागच्या राजाचे रुपडे अधिकच खुलून दिसत आहे.

Leave a Comment