राऊत यांनी मला छेडलं आहे.. याच्यामागे देवेंद्र फडणवीसच-मनोज जरांगे पाटील 

राऊत यांनी मला छेडलं आहे.. याच्यामागे देवेंद्र फडणवीसच-मनोज जरांगे पाटील

Rajendra Rauat barshi मराठा आरक्षणासाठी लढणारे म्हणून जरांगे पाटील यांनी फडणवीसावर आणखी एक आरोप केला आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलावर टीकास्त्र सोडले होते. त्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की याचा बोलविता धनी फडणवीसच आहे.

दरम्यान उपोषणाच्या काळामध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरंगे पाटील यांची जाऊन विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरंगे पाटील हे काहीही उलटसुलट बोलले असा आरोप बार्शी चे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरागे पाटील यांच्यावर केला. राजेंद्र राऊत यांनी जरंगे पाटलांचा सुसंस्कृतपणा नसल्याचा उल्लेख देखील यावेळी केला. आणि म्हणून जरांगे घनघाती टीका केली. तसेच राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना असेही म्हटले की शिवरायांची ही शिकवण नाही तुम्ही शिवरायांच्या रस्त्यावर चालत नाही असेही राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना सुनावले.

परंतु या आरोपाचे खंडन करताना जरांगे पाटील म्हणाले की राऊत यांचा बोलविता धनी दुसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीसच आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा डाव टाकण्याची योजना आखली असून त्याचाच हा भाग असल्याचे देखील बोलले.

महाविकास आघाडीच्या मनात मराठा आरक्षणावरून पाप नसेल तर त्यांच्याकडून तसा कागद लिहून आणा असे आवाहन राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांना केले केले आहे. आणि महायुतीच्य नेत्यांकडून मराठा आरक्षणावरून लिहून आणण्याची जबाबदारी माझी आणि त्यांनी जर नाही लिहून दिले तर मी राजकीय संन्यास घेईल अशी ग्वाही देखील राजेंद्र राऊत यांनी मनोज जरागे पाटलांना दिली होती.

यावरून राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याचे संकेत मिळत आहेत.

 

Leave a Comment