माझ्याकडे सुद्धा यादी तयार आहे 25 आमदार पाडणार 

माझ्याकडे सुद्धा यादी तयार आहे 25 आमदार पाडणार

महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणावरून गेले कित्येक दिवस रणसग्राम एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडत असताना सारा महाराष्ट्र पाहत आहे. अशातच मराठा नेते मनोज जरांग पुन्हा एकदा उपोषणाची हत्यार उपसले असून ते 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मराठा मुक्तिसंग्रामाचे औचित्य साधून त्यांनी उपोषणाचा दिवस निवडला आहे.

त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे नेते आहेत परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना ओबीसी समाजाची ताकद दाखवून देऊ असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की म्हणून जरांगे उपोषण करतील तेव्हा माझही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू होणार आहे.

मनोज जरागे यांच्याकडून सातत्याने आमदार पाण्याची भाषा केली जाते. माझ्याकडे ह 25 आमदाराची यादी असून ओबीसींकडून मराठवाड्यातील 25 आमदार पाडण्यात येणार आहेत असे देखील लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मनोज जरांगे उपोषण चालू करतील त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे देखील उपोषण चालू होईल आणि त्यांच्या उपोषणाला उपोषणाचे उत्तर मिळेल असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. येणाऱ्या निवडणुकीत पंचवीस आमदार पाडून मराठवाड्यातील ओबीसींची ताकद दाखवण्यात येईल असे देखील लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. त्यामुळे काही आमदारांनी निवडणूक न लढवण्याचा देखील निर्णय घेतल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे.

मनोज जरागे यांना उपोषणाच्या दरम्यान जे आमदार भेटले आहेत त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना निवडणुकीमध्ये पाडणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनाही याची किंमत मोजावी लागेल ते अत्यंत दबावाखाली निर्णय घेतात. असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणी च्या लाभार्थीने डोकं लावून कमावले एवढे रुपये..

Maharashtra gov. आता लवकरच आईच्या नावाचा सातबारा निघणार स्त्री सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय

Mumbai Dabewala महाराष्ट्र सरकारचं मुंबईच्या डबेवाल्यांना गिफ्ट

Leave a Comment