Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? त्यांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ नेत्याचा पक्षाला राम राम?
महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारी संख्या खूप मोठी असते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे चित्र सर्रास पहावयास मिळणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित दादा पवार यांच्या गटाला गती पहा लागल्याचे चित्र पहावयास मिळत असून त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आणि पुणे(Pune) परिसरात हे चित्र पहावयास मिळत आहे.
पिंपरी चिंचवड विधानसभा लढवण्याचे इच्छा असणारे भाऊसाहेब भोईर आणि पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्धार केला असून त्यांनी आज गांधी जयंतीच्या दिवशी एक मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यामध्ये ते पुढची दिशा जाहीर करणार आहेत. पिंपरी चिंचवड हा अजित दादा पवार यांचा बालेकिल्ला म्हणून समाजात जातो परंतु त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये हादरा बसण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये तीन पक्ष असून पिंपरी चिंचवड मध्ये सध्याचे आमदार हे भाजपचे असल्याने ही जागा आज जरा पवार याच्या राष्ट्रवादी गटाला सुटणार नाही जवळपास निश्चित झाले आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप या विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे भाऊसाहेब भोईर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते कोणत्या पक्षात जाणार हे आज मेळाव्यामध्ये घोषणा करण्याची शक्यता आहे.
सातत्याने माझ्यावर अन्याय झाला असून जनतेच्या न्यायालयात जाऊन मी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले आहे. आता भाऊसाहेब भोयर हे कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका वर भाजपाची सत्ता आली तत्पूर्वी पंधरा वर्षे एकहाती या महानगरपालिकेवर अजित दादांनी वर्चस्व गाजविले होते. अजित दादांचा बालेकिल्ला हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मध्यंतरीच अजित दादा गटाचे अजित गव्हाणे यांनी दोन माजी महापौरसह 15 माजी नगरसेवकां सह शरद पवार गटात प्रवेश केला होता. तर दसऱ्याच्या मुहूर्त साधून माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Election news: महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Financial Pressure: नवीन योजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक संकट? तरीही योजनांना मंजुरी?