Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला कार्यकर्त्यांना हा ‘मंत्र’.. मित्र जिंकले तर..
नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा आहे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सातत्याने येत असून महाराष्ट्र विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा कानमंत्र ते कार्यकर्त्यांना देत आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक ही देशाच्या राजकारणातील दिशा ठरवणार असून 2029 च्या लोकसभा निवडणूकElection मध्ये भाजप हे एक हाती सत्ता खेचून आणेल.
महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकी तीन पक्ष मिळून महायुतीच्या माध्यमातून लढवणार असून महायुती मधील कार्यकर्त्यांनी मित्रांना जिंकवले तरच आपली सत्ता येणार असल्याने , मित्र जिंकले पाहिजे, अशी भावना ठेवा. पाडापाडीचे राजकारण करू नका. असा सल्ला देखील त्यांनी या माध्यमातून महायुतीमधील सर्व नेत्यांना दिला आहे.
प्रत्येक बुथवर आपले दहा कार्यकर्ते ठेवण्याच्या आवाहन देखील त्यांनी केले आहे तसेच सरासरी मतदानामध्ये दहा टक्के मतदान वाढवण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी महायुती सक्षमपणे पेलेल आणि जिंकून दाखवेल असा विश्वास त्यांनी कार्यकर्ते मध्ये जागवला आहे. गेलेल्या लोकसभा निवडणुकीचे अपयश यामुळे अजिबात निराश होऊ नका, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्र विधानसभेवर अमित शहा यांचे बारीक लक्ष असून ते कार्यकर्त्यांना वारंवार उत्साह वाढवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस हा पक्ष देशभर पराभूत होत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मित्र पक्षाला सोबत ठेवणे हे आपल्याला गरजेचे असून मित्र पक्षांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा आपलाच उमेदवार आहे ह्या भावनेने काम करा असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये भाजपाचे सत्ता आल्यानंतर समान नागरी कायदा लागू केला जाईल असे वक्तव्य देखील अमित शहा यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र सरकार सांभाळण्यास हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समर्थ आहेत असा देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? त्यांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ नेत्याचा पक्षाला राम राम?
Maharashtra Election news: महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Financial Pressure: नवीन योजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक संकट? तरीही योजनांना मंजुरी?