Amit Shah: यांचा पक्षच मुळापासून संपवून टाकायचा आहे अमित शहा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर कडाडले

Amit Shah: यांचा पक्षच मुळापासून संपवून टाकायचा आहे अमित शहा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर कडाडले

महाराष्ट्र विधानसभा: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Election )लवकरच होणार असल्याने विविध पक्षांचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रामध्ये सभांचे दौरे करत असून यामधून विरुद्ध पक्षावर कडाडून टीका करण्यात येत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक मध्ये भाजपाची महाराष्ट्र मध्ये चांगली पिछेहाट झाली होती त्या पार्श्वभूमीवर अमित शहा महाराष्ट्र मध्ये चांगले सक्रिय झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये  झालेल्या अपयशामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाता कामा नये असा संदेश देत त्यांनी कोल्हापूर येथील सभेमध्ये कार्यकर्त्यांना दिला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर कडाडून टीका सुद्धा केली असून त्यांच्या पक्षाला आपल्याला संपून टाकायचे आहे अशी देखील गर्जना केली आहे.

विधानसभा निवडणूक मध्ये आपल्याला बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची जोडण्याचे काम करायचे आहे असा देखील संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. नवीन कार्यकर्ते जोडल्यानंतर पक्षातील आपले स्थान काय असेल किंवा आपल्या स्थानावर धोका पोहोचेल असे काहीही मनामध्ये वाटून घेण्याचे कारण नाही असे देखील या माध्यमातून म्हणाले आहेत. कारण पक्ष कार्यकर्त्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून काही गोष्टी त्यांना मिळत जाती असे देखील म्हणाले. दहा ते पंधरा वर्षापासून कार्यकर्त्यांना काही वेळ नाही तर नवीन कार्यकर्त्यांना कसे मिळणार अशा पद्धतीने सूचक विधान केले आहे.

जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही योग्य वेळ लागेल की त्यांनाही काही ना काही पदरात पडणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला नंतर कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नकारात्मक परिणाम आला होता परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे असा सल्ला देखील अमित शहा यांनी दिला आहे.

यावर उदाहरण देताना त्यांनी म्हटले की आमचा तरुणपणाचा काळ सगळा पक्ष वाढवण्यात गेला परंतु आता आम्हाला यश मिळाले असून वेळ आणि नक्की काही ना काही मिळतील असा संदेश त्यांनी दिला. जेव्हा भारतीय जनता पक्ष स्थापन झाला होता त्यावेळी कोणी विचार सुद्धा केला नव्हता की सत्ता त्यामध्ये येईल परंतु ते स्वप्न साकार झाले असेल कार्यकर्त्यांनी कधीही निराशा बाळगू नये.

स्वतंत्र नंतर प्रथमच सलग तीन वेळा सरकार स्थापन भाजपने दिली असून केंद्रामध्ये सत्ता बाहेर भाजपाची असल्याने महाराष्ट्र मध्ये सुद्धा महायुतीचे सरकार यावे अशी त्यांनी अपेक्षा बाळगली आहे. त्यानंतर त्यांनी राम मंदिर आणि 370 कलम यांची उदाहरणे देखील दिली.

महत्वाच्या बातम्या

विठूरायाच्या सुलभ दर्शनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद, दर्शनरांगेसाठी 129 कोटी रुपये मंजूर 

30 September 30 सप्टेंबरला मिळणार लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता.

Lemon Rates ऐन पावसाळ्यात सुद्धा लिंबू तेजीत,एका किलोला ‘इतका’ भाव 

Leave a Comment