पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संकेत..

पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संकेत..

Maharashtra Election महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपले असताना प्रचाराचा तडाका सर्वच पक्षांच्या नेत्याकडून सुरू झाला आहे. आपापल्या नेत्यांचे उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौरा होत असून राहुल गांधींनी देखील आपल्या उमेदवारासाठी सभा घेतलेले आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते यांनी भाजपच्या प्रचारासाठी काल प्रचाराचा शुभारंभ केला.

या प्रचार सभेवेळी केंद्रीय गृहमंत्री यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. या कौतुकामुळे महायुतीची सत्ता आल्यास राज्याचे नेतृत्व हे देवेंद्र फडणीसांकडे सोपवले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तसेच महायुतीची सत्ता जर महाराष्ट्रात पुढे आली तर वाढवण बंदराजवळ एक विमानतळ उभारण्याची देवेंद्र फडणवीस अशी इच्छा पूर्ण केली जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या प्रचार सभेमध्ये लोकांना सांगितले. या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलेले आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीसच बसणार असल्याचे बोलले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यचे कौतुक करताना अमित शहा म्हणाले की दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्रात दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये महायुतीचे सरकार आणून देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे असे लोकांच्या मनात आहे. असे शहा पुढे म्हणाले.

या दोन्ही नेत्यांच्या प्रचारसभावेळी त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटात देखील चर्चा होत असून, भाजपच्या नेत्यांनी भावी मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केलेला आहे.

या प्रश्नाविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी तडजोडीस मान्यता दिली असून तूर्तास महायुतीचे सरकार आणण्यास प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले. यावर ते म्हणाले की भाजपा 152 तसेच शिंदे गट 85 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 जागा लढवत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावरून असे दिसते की महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून भविष्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, महागाईचा भडका, लसुन 500 तर कांदा 80 रुपये किलो

Leave a Comment