Bacchu Kadu आम्हाला तुमची योजना नको, कांद्याला भाव द्या.बच्चू कडू सरकारवर बरसले
शेतकरी आणि सामान्य लोकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे आमदार म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी उमराणा येथे झालेल्या सभेत राज्य सरकारवर त्यांच्या योजनांवर टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू यांनी झालेला सभेमध्ये लाडकी बहीण योजना वर टीका केली आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी च्या धरसोडीच्या धोरणावर देखील टीका केली आहे. तुम्ही आम्हाला योजना का देता त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या तीच फक्त शेतकऱ्याची मागणी आहे. जर तुम्ही आमच्या कांद्याला भाव दिला तर आम्ही प्रत्येक आमदाराला चार क्विंटल आणि मुख्यमंत्र्यांना पंधरा मिनिटं आणि पंतप्रधानांना एक ट्रक भर कांदे मोफत देऊ अशी उपासनात्मक ठिकाणी केंद्र सरकारवर केली.
जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा असतो तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करत नाही. परंतु कांदा महाग झाला की तुम्ही लगेच हस्तक्षेप करता देखील त्यांनी केंद्र सरकारला सुनावले. कांद्याचे भाव पडलेले असताना खासदार आमदार काही बोलत नाहीत. प्रत्येकांना त्यांचा प्रक्ष प्रिय असून सामान्य शेतकऱ्यांचे देणे घेणे कोणालाही नाही. परंतु या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवण्यात येईल अशी देखील टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
तुम्ही शेतकऱ्यांना रडवले आहे आता तुम्हाला रडण्याची वेळ आली आहे असे देखील त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या व्यवस्थेवर टीका असते सोडले. राज्यामध्ये राजकारणाची स्थितीअतिशय गंभीर असून राष्ट्रवादी दोन पक्ष शिवसेनेचे दोन पक्ष थोडा पुढचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या विचाराचे आमदार निवडून द्यावेत अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. या सभेतून त्यांनी विधानसभा निवडणुकीचे देखील रणशिंग फुंकले असून त्यांनी दोन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे.
बच्चू बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणूक साठी चांदवड देवळा मतदार संघामधून गणेश निंबाळकर आणि निफाड विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुदेव कांदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच लोकांनी यांच्या पाठीशी उभे राहून सामान्य लोकांचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवा असे देखील आवाहन केले आहे.
दरम्यान कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केले असता त्यांनी वाणिज्यमंत्री यांना या घटनेची तपासणी करून सत्य बाहेर आणावे अशी देखील सुनावले आहे. नाहीतर तुमच्या गाडीवर कांदे फेकण्यात येतील असा देखील इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Gopichand padalakar on Sharad Pawar. शरद पवारांनी 50 ते 60 वर्षे फक्त लुटायचं काम केलं आहे
Manoj jarange सरकारने आरक्षण न दिल्यास याला जबाबदार देवेंद्र फडणवीस- मनोज जरांगे
धनगर आरक्षण संबंधी मोठा निर्णय लवकरच जीआर काढणार- मुख्यमंत्री
बारामतीकरांना आदिवासी खेळाडूंचे यश दिसत नाही का कविता राऊत यांची सुप्रिया सुळेंवर टीका