Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर खरमरीत टीका

Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर खरमरीत टीका

महाराष्ट्र विधानसभेचे पडघम महाराष्ट्र राज्य मध्ये वाजू लागले आहेत या माध्यमातून विविध पक्षातील लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. आता महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण व्हावा याची चर्चा करणे गरजेचे आहे असा टोला थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांवर मारला आहे.

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या विविध गटांच्या बैठकांचे सत्र सुरू असून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी महायुतीच्या नेत्यांना सल्ला दिला की मुख्यमंत्री कोण होण्यापेक्षा आपला विरोधी पक्षनेता कोण होईल याची चर्चा करा. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच महाराष्ट्र राज्यामध्ये बहुमताने निवडून येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदाची चर्चा करत बसण्यापेक्षा विरोधी पक्ष नेता निवडी वर चर्चा करा असा टोला त्यांनी लगावला.

विकास आघाडी मधला जागा वाटपाचा येतात सुटत आला असून 125 जागावर सर्वांचे एकमत झाले असून 25 ते 30 जागावर चर्चा सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. जागा वाटपाचे चर्चेवर एक एक मतदारसंघाच्या जागावर चर्चा होत असते त्यामुळे उशीर लागत असतो. परंतु तो तिढाही लवकरच सुटेल आणि महाविकास आघाडी या विधानसभा निवडणुकीला सामोरी जाईल आणि विजय संपादन करेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक पक्ष हा आपल्याला हवे असल्यास या जागेवर दावा करत असतो परंतु चर्चा करून तो आम्ही सोडवू असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. येथे दहा ते पंधरा दिवसात जागा वाटपाचं चित्र समोर येईल.

बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता त्यावर त्यांनी असे म्हटले की भारतामध्ये लोकशाही असल्याने लोकशाहीमध्ये जनताच सरकार बनत असते काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा करणे महत्त्वाचे नसून निवडणुका जिंकणे हे महत्त्वाचे आहे. भाजपाचा विकास किती खोटा आणि नकली आहे. हे जनतेसमोर आणणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असून. महायुतीचे सरकार सत्तेतून हद्दपार करणे प्राथमिकता असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

Bacchu Kadu आम्हाला तुमची योजना नको, कांद्याला भाव द्या.बच्चू कडू सरकारवर बरसले 

Gopichand padalakar on Sharad Pawar. शरद पवारांनी 50 ते 60 वर्षे फक्त लुटायचं काम केलं आहे

Manoj jarange सरकारने आरक्षण न दिल्यास याला जबाबदार देवेंद्र फडणवीस- मनोज जरांगे 

धनगर आरक्षण संबंधी मोठा निर्णय लवकरच जीआर काढणार- मुख्यमंत्री

 

Leave a Comment