मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान Eknath Shinde 

मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान Eknath Shinde

महाराष्ट्र मधील निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आली असून प्रचाराला अगदी काही तास उरले असून त्यातच महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठे विधान केले असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. Eknath Shinde

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये आणि तसेच महायुतीमध्ये सुद्धा रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गेली दोन महिने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा रंगली असून सोशल मीडियावर कमेंट्स चा पाऊस पडत आहे.

Eknath Shinde माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या असून यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वसामान्य मतदाराला पडलेला प्रश्न आहे.

या मुलाखतीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटावर प्रचंड टीका केली असून त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. असा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला आहे. हिंदुहृदयसम्राट मा .बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की मी शिवसेनेचे कधी काँग्रेस होऊ देणार नाही परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीमध्ये सामील झाले.

पंतप्रधानांनी दिलेल्या एक हे तो सेफ हे या घोषणेला समर्थन मा.एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधीवर आरोप केला असून त्यांनी फक्त माननीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट असे म्हणावे. काल बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतला असून याची स्तुती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

आज जर माननीय बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे यांना जंगलामध्ये फोटो काढायला वाटून दिले असते अशी टीका देखील माननीय शिंदे यांनी केले आहे. आपल्याला भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती परंतु त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद घेतले असा आरोप देखील त्यांनी केला.

Leave a Comment