Election commission of India केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर..
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणार असल्याचे स्पष्ट होत असून, केंद्रीय निवडणूक आयोगाची एक पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या वेळेवर होतील असे वाटत आहे. महाराष्ट्र सरकारने लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा किंवा अपयशाचा विचार करता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून योजनेचा बंपर धमाका चालू केला आहे
.Election commission of India केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर..
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा वेळेवर देण्यासाठी तसेच निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम तयार करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारा असल्याचे निश्चित झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा दौरा होण्याची शक्यता सूत्रांकडून कळत आहे. या पथकामध्ये दहा ते बारा सदस्य असणार आहे.
महाराष्ट्र वधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी हा दौरा असून केंद्रीय समिती ही राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतील. विशेष म्हणजे या टीम मध निवडणूक निवडणूक मुख्य आयुक्त आणि दोन उपायुक्त असणार आहेत.
👇येथे क्लिक करा👇
Rushi Kapoor: स्वतःच्या लग्नात झाले बेशद्ध नंतर पुन्हा असे लावले लग्न
मध्यंतरी जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत सोबत झाल्या होत्या.
महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात 26 नोव्हेंबरला संपत असून हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर ला संपत आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या कार्यकाळ संपण्याआधीच होणार असल्यामुळे 26 नोव्हेंबर पूर्वी सरकार अस्तित्वात यण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार हे निश्चित मानले जात आहे.
त्यामुळे विविध राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागतील यात शंका नाही.