सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, महागाईचा भडका, लसुन 500 तर कांदा 80 रुपये किलो
राज्यामध्ये निवडणुकांचे दिवस असतानाच सामान्य नागरिकांना महागाईच्या प्रचंड फटका बसत असून यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून लसणाचे दर हे पाचशे रुपये पर्यंत तर कांद्याचे दर 80 रुपये किलो पर्यंत वाढताना दिसत आहेत. तर हिवाळ्यात येणारा वाटाणा देखील अतिवृष्टीने अडीचशे रुपये किलो पर्यंत भाव खात आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महागाईच्या प्रचंड तडाका सर्वसामान्यांना बसत आहे.
दिवाळीच्या आधी सरासरी 30 रुपये किलोने मिळणारा कांदा हा या आठवड्यामध्ये 80 रुपये किलोच्या घरात सामान्यांना मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा प्रचंड फटका बसताना पहावयास मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजून दोन ते तीन आठवडे कांदा महागच मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले असून एकरी उत्पादन घटले असून कांद्याचे प्रचंड नासाडी शेतामध्ये झालेली दिसत आहे. यामुळे शहरी भागातील सर्वसामान्य लोकांना हा कांदा प्रचंड महाग मिळताना दिसत आहे. अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे आवक घटली आहे. ही स्थिती सुधारण्यास डिसेंबरचा महिना उजाडण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढलेले दिसत असताना वाटाणा हा बाजार समितीमध्ये 160 ते २०० रुपये किलोने बाजार समितीमध्ये विकताना दिसत आहे. यामुळे किरकोळ बाजारात याचे दर 250 रुपये पर्यंत वाढलेले आहेत.
सध्या किरकोळ बाजारामध्ये लसणाचे भाव हे प्रचंड वाढलेले दिसत आहेत. लसणाचे किरकोळ विक्री ही पाचशे रुपये किलो प्रमाणे होत असून यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले दिसत आहे. नवीन वर्षात लसूण येईपर्यंत ही भाव वाढ सुरूच राहील असे देखील जाणकारांचे मत आहे.
किरकोळ बाजारामध्ये मेथीची जुडी ही 30 रुपये पर्यंत मिळत असून शेतची जोडी देखील वीस रुपये पर्यंत मिळत असल्याचे दिसत आहे. शेवग्याच्या दर देखील किरकोळ बाजारामध्ये 130 रुपये किलो आहेत.
परतीच्या पावसाने नुकसान केल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून बाजारामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नवीन भाजीपाला बाजारात जोपर्यंत येताना दिसत नाही तोपर्यंत याचे दर वाढलेले दिसतील असे जाणकारांचे मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या 👇
हरियाणा मधील निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महाविकास आघाडीवर जोरदार टीका
तुम्ही जिथे बसलात हे तर आमचेच पाप आहे,.. उद्धव ठाकरे यांची सभेमध्ये जोरदार हल्लाबोल