Financial Pressure: नवीन योजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक संकट? तरीही योजनांना मंजुरी?

Financial Pressure: नवीन योजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक संकट? तरीही योजनांना मंजुरी?

नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Election)होणार असा अंदाज वर्तवल जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला असून याचा ताण वित्त विभागावर पडणार असल्याचे तज्ञांची म्हणणे असून. महाराष्ट्र राज्य या योजनांमुळे आर्थिक दबाव खाली असल्याचे वित्त विभागाने सांगितले आहे. वित्त विभागावर अतिरिक्त बोजा करणार असल्याचे वित्त विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

क्रीडा विभागाने क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1781 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु वित्त विभागाच्या समर्थतेशिवाय हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. क्रीडा मंत संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने क्रीडा संकुल उभारण्यासाठी रक्कम मागितली होती.2024-25 या आर्थिक वर्षामध् वित्तीय तूट ही सुमारे एक लाख 99 हजार 125 कोटी एवढी होती. महाराष्ट्र राज्याची महसुली तूट देखील 3% च्या वर गेले असताना राज्याची आर्थिक परिस्थिती ही बिकट असून या परिस्थितीमध्ये राज्य सरकार आर्थिक रित्या अतिरिक्त बोजा स्वीकारू शकत नाही असे अर्थ विभागाने स्पष्ट सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांशी योजनेपैकी एक असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजना आहे. या योजनेला दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अतिरिक्त तीन मोफत सिलेंडर या योजनेचा सुद्धा अर्थ विभागावर अतिरिक्त भार असणार आहे. तसेच मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी अतिरिक्त शंभर टक्के रक्कम  सुद्धा मंजूर करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यात झाली सुरुवात तुम्हाला आले की नाही असे चेक करा.

Devendra fadnvis बहिणींनो सावत्र भावापासून तुम्ही सावध राहा. लाडक्या बहिणींना दिला सल्ला.

PM Kisan शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 18 वा हप्ता 

Leave a Comment