शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि धुळे येथे प्रचार सभा घेणार असून अमित शहा देखील महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या प्रचार सभेमध्ये महाविकास आघाडीवर घनघाती टीका केली असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शब्द दिला आहे.
जर महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेत आलो तर राज्य सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असून कोणत्याही पिकाचा भाव हा हमीभावाच्या पेक्षा सुद्धा कमी झाला असेल तर भावांतर योजना राबवून त्याचे पैसे शेतकऱ्यांचे डायरेक्ट खात्यावर जमा करण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या प्रचार सभेत शेतकऱ्यांना शब्द दिला आहे.
आमचा पक्ष हा नेहमी नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चालत असून विविध विकास कामे देखील पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मनमाड ते इंदूर रेल्वे सेवेच्या माध्यमातून अशा प्रकारचं केंद्र तर धुळ्या मध्ये तयार होत असून केंद्र सरकारने सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धुळे जिल्हा हा आपल्या जिल्ह्यातील पाचही जागा महायुतीच्या पारड्यामध्ये टाकणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. धुळे जिल्हा हा शंभर टक्के रिझल्ट देणारा जिल्हा असल्याचे देखील उदगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत.
आपल्या सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुलींना मोफत शिक्षण ,तसेच एक रुपयांमध्ये सर्व पिकांचा विमा, तसेच नरेंद्र मोदींची लखपती निधी योजना योग्य पद्धतीने राबविली असल्याचे त्यांनी सांगितले. या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी वीजबलातून शंभर टक्के सुटका केली असून त्यांचे शंभर टक्के वीज बिल पुढच्या पाच वर्षासाठी माफ असेल असे देखील त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवून आपले सरकार हे सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर नेणाऱ्या असून महाविकास आघाडीने राज्यांमध्ये फेक नरेटीव पसरवायला असून या नरेटीवला लोकांनी बळी पडू नये असे देखील त्यांनी सांगितले.
विरोधक हे आता वोटजिहाद माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत असे देखील त्यांनी सांगितले धुळ्यात त्यांनी वोट ज्याच्या माध्यमातून चार हजार मतांनी विजय मिळवला असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. आता जर आपण जागे झालो नाही तरी आपल्याला नेहमीसाठी झोपावे लागेल असा इशारा देखील त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या 👇
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, महागाईचा भडका, लसुन 500 तर कांदा 80 रुपये किलो
हरियाणा मधील निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महाविकास आघाडीवर जोरदार टीका