Gopichand padalakar on Sharad Pawar. शरद पवारांनी 50 ते 60 वर्षे फक्त लुटायचं काम केलं आहे
महिना बरोबर निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच नेत्यांनी एकमेकांवर चिखल फेक करायला सुरुवात केली असून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की शरद पवार यांच्या मुळेच महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालेला असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्या महाराष्ट्राला झळाळी दिलती ती पूर्णपणे शरद पवारांनी झाकून टाकली आहे.
शरद पवार यांच्या हातात सत्ता देऊन पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे हे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पुढे पडळकर म्हणतात की शरद पवार भाषणात असे म्हणतात की माझ्या हातात सत्ता द्या परंतु तुमच्या हातात सत्ता देऊन काय अजून इतिहासाची काळी पाने लिहायची बाकी आहेत का असे देखील ते म्हणाले.
आज महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर शरद पवार साहेबांमुळेच झाला असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी 50 ते 60 वर्षे फक्त लुटायचं काम केलेलं आहे असे देखील पडळकर म्हणाले. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या मते शरद पवार जेव्हा सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी पान होती. त्यांनी फक्त लुटीचा राजकारण केलं आहे. महाराष्ट्राला सध्या सर्व समाज विकास आणि विकासाचा चेहरा मिळाला असताना त्यांच्या हातात सत्ता देऊन महाराष्ट्रावर काय सरंजामी ला दायची का विकास करायचा. तसेच दलित आणि ओबीसी यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ करायची आहे का यामध्ये नवे अध्याय लिहायचे आहेत का असे देखील प्रश्न उपस्थित त्यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जास्त जवळ येईल तशा राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
Manoj jarange सरकारने आरक्षण न दिल्यास याला जबाबदार देवेंद्र फडणवीस- मनोज जरांगे
धनगर आरक्षण संबंधी मोठा निर्णय लवकरच जीआर काढणार- मुख्यमंत्री
बारामतीकरांना आदिवासी खेळाडूंचे यश दिसत नाही का कविता राऊत यांची सुप्रिया सुळेंवर टीका