Kavita Raut धावपटू कविता राऊत नाराज, अर्थ खात्यावर ओढले ताशेरे.

Kavita Raut धावपटू कविता राऊत नाराज, अर्थ खात्यावर ओढले ताशेरे.

Kavita Raut धावपटू कविता राऊत नाराज, अर्थ खात्यावर ओढले ताशेरे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू कविता राऊत यांना नुकतीच राज्य सरकारने सरकारी नोकरीमध्ये घेतले असून तरीसुद्धा कविता राऊत या नाराज असल्याचे दिसत आहेत. त्यांची नियुक्ती ही मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली होती. परंतु या नियुक्तीवर कविता राऊत या नाराज असल्याचे कळते. दहा वर्षे संघर्ष करून देखील न्याय मिळत नाही असे ताशेरे त्यांनी सरकारवर ओढले आहेत .

 

सरकारच्या विरोधात त्या न्यायालयांमध्ये दाद मागणार असून माझ्यासोबत ऑलिम्पिक खेळणाऱ्या ललिता बाबर सोबत एक न्याय आणि माझ्यासोबत दुसरा न्याय असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या इतर खात्यामध्ये फाईल पुढे सरकत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला असून विशेषता अर्थ खात्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. अर्थ खात्यामध्ये फाईल पुढे जात नाही ती अडकवले जाते असे त्यांनी म्हटले आहे.

 

आंतरराष्ट्रीय पात्र व देशाचे नाव झळकवणाऱ्या कविता राऊत सह इतर दहा जणांना देखील नोकरीमध्ये सामावून घेतलेले जाणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. परंतु या नोकरीमध्ये समाधान नसल्याचे कविता राऊत यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. त्यांनी सरकारकडे उपजिल्हाधिकारी पदाची मागणी केली असून यावर सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

यापूर्वी कविताला अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले असून राष्ट्रकुल स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. रिओ ऑलम्पिक मध्ये तिने भारताचा सदस्य सहभाग घेतला होता. इतर राष्ट्रीय स्पर्धा मधून तिने अनेक पदके आपल्या नावावर केली असून ती एक आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेध्ये तिने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते.

Leave a Comment