Ladaki Bahinabai Yojana लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणार 40 हजार रुपयांचे कर्ज

Ladaki Bahinabai Yojana लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणार 40 हजार रुपयांचे कर्जवाटप 

Ladaki Bahinabai Yojana महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये खास महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे. मासिक दीड हजार मानधनाची ही योजना असून आतापर्यंत साधारणता दहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

Mahavitaran Recruitment 2025: महावितरण मध्ये निघाली भरती 

Bombay High Court Bharati 2025: मुंबई उच्च न्यायालयात निघाली भरती

महाराष्ट्र राज्य सरकारने आता या योजनेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला असून, महिलांना आता 4,0000 रुपयांचे कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवली आहे. अशी घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी नुकतीच केलेली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अजित दादा पवार यांनी सांगितले की, ज्या महिला आपला छोटा व्यवसाय किंवा एखादा लघु उद्योग उभारू इच्छितात आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ इच्छितात, परंतु त्यांच्याकडे भांडवल नसल्याने त्यात अडचणी येतात. अशा महिलांना राज्य सरकार चाळीस हजार रुपयांचे कर्ज देणार आहे. आणि या कर्जाचा हप्ता मराठी सरकार मासिक दीड हजार रुपयांच्या निधीतून घेतलं जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

उद्योग उभारणीस मदत

राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय महिलांसाठी खूपच उपयोगी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे महिलांना आपला उद्योग आणि व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज मिळणार असून या कर्जाचे हप्ते राज्य शासनच भरणार आहे. या निर्णयामुळे महिला कोणताही अल्प भांडवली उद्योग उभा करून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.

अजित पवारांनी केली घोषणा

महिलांसाठी या कर्ज स्वरूपाच्या योजने ची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी  बँकांशी चर्चा चालू असल्याचे देखील अजित पवार यांनी कार्यक्रमांमध्ये सांगितले. नांदेड जिल्हा बँकेसोबत बोलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

ही योजना बंद होणार नाही याची शाश्वती देखील महिलांना अजित पवारांनी या सभेच्या माध्यमातून दिलेली आहे. अजित पवार पुढे म्हणाले की विरोधक या योजनेला विरोध करत असून ती बंद पडण्याच्या अफवा पसरवत आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

योजनेची वैशिष्ट्ये

महिलांना चाळीस हजार रुपये कर्ज दिल्यानंतर या योजनेचे हप्ते राज्य सरकार भरणार असल्याने याचा  कोणताही अतिरिक्त भुर्दंड महिलांवर पडणार नाही. महिलांना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांच्या माध्यमातून याचा हप्ता वळता केला जाईल.

 

 

Leave a Comment