Ladki bahin yojana: या लाडक्या बहिणींना वगळले, नवीन नियम आले
महाराष्ट्र मध्ये अत्यंत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजना यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केले आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांनी या आधी सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे का नाही याची पडताळणी राज्य सरकारने सुरू केलेले आहे.
लाडकी बहीण योजना
पात्रता यादी
महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेमधून राज्य सरकारने आतापर्यंत पाच लाख महिलांची या योजनेमधून नावे कमी केलेले आहेत. महाराष्ट्र परिवहन आणि आयकर विभागाच्या मदतीने या छाननीचे काम सुरू आहे. आता यापुढे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागात मार्फत करण्यात आले आहे. यामुळे यापुढे अनेक महिलांवर या योजनेमधून बाद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अपात्रता स्थिती
ज्या लाडक्या बहिणीने इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना देखील या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आढळल्यास त्या महिलांना देखील या योजनेमधून बात करण्यात येणार आहे.
👇👇👇👇👇👇👇
लाडकी बहीण पात्रता यादी
याचबरोबर या योजनेचा लाभ हा अनेक बनावट कागदपत्रे तयार करून घेण्यात आलेला आहे अशा महिलांना देखील या योजनेमधून बाहेर काढण्यात येणार आहे. लवकरच अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू होणार असून यामधून अनेक महिलांना यामधून वगळण्यात येणार आहे.
असे असतील निकष
- महिलांचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असू नये.
- कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
- महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- बँक खाते आणि आधार कार्ड यामधील नावांमध्ये तफावत असणाऱ्या महिला.
ज्या महिलांना स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडवण्याची इच्छा असेल तर त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे अर्ज करण्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. याच बरोबर महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही असे स्वयंघोषणापत्र जमा करावयाचे आहेत.