या लाडक्या बहिणींची चिंता वाढली, मिळणार नाहीत यापुढे 1500 रुपये
Ladaki bahin yojana: महाराष्ट्र राज्यातील योजनांचा विचार करायचा झाल्यास सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना चालू केलेली होती या योजनाला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे राजकारणात या योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या योजनेसाठी वेगवेगळे निकष करण्यात आलेले आहेत. घरात चार चाकी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. याची पडताळणी अंगणवाडी सेविका क्रमांक करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नवीन निकषांमध्ये किती महिला अपात्र ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लाडकी बहीण या योजनेला महाराष्ट्र मधून सुमारे अडीच कोटीच्या संख्येने अर्ज आलेले आहेत. सुमारे पाच लाख महिलांना यातून वगळण्यात आले आहे. काही काही महिलांनी इतर योजनेचा लाभ घेऊन सुद्धा या योजनेला अर्ज केलेला आहे. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, अशा योजनांचा लाभ मिळत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे शासनाने यापूर्वी स्पष्ट केलेले आहे. निवडणुकीपूर्वी घाईगडबडीमध्ये पात्र ठरविण्यात आलेल्या महिलांची यादी सरकारने काढलेली असून दोन शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या दोन वगळण्यात येणार आहेत.
सरकारने या लोकप्रिय योजना चालू केल्यामुळे सरकारी तिजोरीवरील खर्चाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे इतर योजनांना कात्री लागण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. शासकीय योजना साठी सरकारवर कर्ज काढण्याची वेळ आल्याची दिसत आहे. यामुळे सरकारने अपात्र महिलांची यादी काढून या महिलांची नावे यामधून वगळण्याचे ठरवले आहे.
पडताळणीचे निकष
कस कुटुंबातील दोन दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्यास त्यांना वगळण्यात येणार आहे. ज्या मुलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इतर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्या महिलांची नावे यातून कमी करण्यात येणार आहेत. तसेच ज्या महिलांनी शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळत आहे अशा 19 लाख महिलांना देखील यातून वगळण्यात येणार आहे असे सूत्राकडून कळत आहे.
त्यामुळे कोणकोणत्या महिलांची नावे कमी होणार आहेत यातून महिला वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.