Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यात झाली सुरुवात तुम्हाला आले की नाही असे चेक करा.
महाराष्ट्र शासनाचे एक महत्वकांक्षी योजना असलेली योजनांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असून महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मासिक दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. आता सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी केली होती आणि ज्या महिलांना खात्यामध्ये एक रुपया सुद्धा आला नाहीत त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार जमा होणार असून पहिले टप्प्यात नोंदणी केलेले आणि तीन हजार रुपये मिळालेल्या महिलांना दीड हजार रुपये जमा होत आहेत.
महिलांनी दुसऱ्या टप्प्यात सुद्धा नोंदणी केली असून या महिलांची संख्या दोन लाख 31 हजार 294 इतकी आहे. परंतु काही महिलांची ही बँक खती आधारशी संलग्नित नसल्यामुळे त्यांना पैसे मिळण्यास अडचणी येत आहे. अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँकेची जोडून घ्यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते आणि तसेच सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना देखील त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत.
महिलाचे बँक खाते हे आधार कार्डशी संलग्नित असले तरच पैसे जमा होणार असून तुमचे बँक खाते आदर्श संलग्न आहे का नाही याची खात्री करून घ्या. तसेच तुम्ही विविध ॲपच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा झाले की नाही याची पडताळणी करू शकता. बँकेत गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसे आल्याची माहिती मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
Devendra fadnvis बहिणींनो सावत्र भावापासून तुम्ही सावध राहा. लाडक्या बहिणींना दिला सल्ला.
PM Kisan शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 18 वा हप्ता
Amit Shah: यांचा पक्षच मुळापासून संपवून टाकायचा आहे अमित शहा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर कडाडले