Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेतील अजून एक गैरप्रकार
महिलांना आर्थिक स्वरूपात मदत होण्यासाठी सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सुरू करायला या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून स्त्रियांना देण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणता दीड कोटींच्या वर महिलांना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
मध्यंतरी एकाच महिन्याच्या नावाने 30 खाते उघडण्यात आलेली घटना ताजी असतानाच आता एक नवीन घटना समोर आलेली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या नावाने पुरुषांनी बारा ठिकाणी फॉर्म भरला असून ही घटना समोर आली आहे. या घटनेचा चौकशीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुरुषाचा फोटो लावून या या योजनेचा लाभ घेण्याची उद्देश यातून दिसत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला लाभ मिळवण्यासाठी पुरुषांनी प्रकार केल्याचे या योजनेत च्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. पडताळणीच्या वेळेस ही बाब लक्षात आले असून यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत. यामध्ये नाव पुरुषाचं आणि आधार कार्ड स्त्रियांचं अपलोड करण्यात आला असून यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आले असून उर्वरित महिलांनी आपले फॉर्म अंगणवाडी सेविकाकडे जमा करण्याचा नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून गैर प्रकार रोखण्यास मदत होऊ शकते.
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेत गैरप्रकार केला तर त्यांना योग्य ती शिक्षा केली जाईल असे आश्वासन कालच्या एका सभेमध्ये दिले होते. कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केला तर मग चक्की पीसी असे देखील अजित दादा पवार कालच्या सभेमध्ये बोलले होते.
हे सुद्धा वाचा 👇
Election commission of India केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर..
Kavita Raut धावपटू कविता राऊत नाराज, अर्थ खात्यावर ओढले ताशेरे.
Rajendra Rauat aandolan आमदार राजेंद्र राऊत यांचे बार्शी मध्ये ठिय्या आंदोलन