LIC Policy Karj: एलआयसी पॉलिसी असेल तर मिळवा कर्ज जाणून घ्या प्रक्रिया
माणसाला दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामध्ये आर्थिक अडचणी सुद्धा असतात. जेव्हा माणूस आरती करता येत असतो तेव्हा कर्ज या प्रक्रियेकडे आकर्षित होत असतो. त्यासाठी पर्सनल लोन हा पर्याय त्याच्याकडे उपलब्ध असतो. परंतु पर्सनल लोन हे खूप महागडे असू शकते. त्याचे व्याजदर सुद्धा खूप वाढीव असतात. खूप अशा बँका पर्सनल लोन देत असतात परंतु त्याची व्याजदर दहा ते पंधरा टक्क्यांच्या पुढे असतात ते माणसाच्या आवाक्या बाहेरचे असते.
LIC policy karj
बँकांच्या महागड्या व्याजदर आपण व्याजदरापासून सुटका करायची असेल तर दुसरा ऑप्शन आपल्याकडे असतो. त्याच्या मदतीने आपण कमी व्याजदरावर देखील कर्ज घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे एलआयसी ची पॉलिसी हवी असते. आपण एलआयसी ची पॉलिसी उतरवून घेतलेली पाहिजे. कारण एलआयसी पॉलिसी वर आपल्याला कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते. चला तर जाणून घेऊया एलआयसी पॉलिसी वर कर्ज कसे मिळवावे आणि त्याची प्रक्रिया काय आहे ते.
LIC policy karj पात्रता
जर तुम्हाला एलआयसीच्या पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला काही निकष किंवा पात्रता पूर्ण करावे लागतील. जसे की तुम्ही भारताचे नागरिक असावे लागतील आणि तुमचे वय हे अठरा वर्षाच्या पुढे असावे लागेल. ज्या व्यक्तीच्या नावे कर्ज घ्यावयाचे आहे तो व्यक्ती एलआयसी पॉलिसी धारक असावा आणि त्याने आपल्या पॉलिसीचे कमीत कमी तीन हप्ते तरी भरलेले असावेत. तीन हप्ते जर नाही भरलेले असतील तर त्यांना कर्ज भेटू शकत नाही.
एलआयसी पॉलिसी कर्ज आणि त्याचे फायदे
जर एखाद्या व्यक्तीने एलआयसी पॉलिसी कर्ज घेतले असेल तर त्याला खूप सारे फायदे मिळू शकतील. त्या व्यक्तीला आपल्या पॉलिसी रकमेच्या 70 ते 80% रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते. हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. एलआयसी पॉलिसी वर जर तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला पर्सनल कर्जापेक्षा कमी व्याज भरावे लागेल. त्यावर तुम्हाला कमी व्याज आकारण्यात येईल.
जितके लवकर तुम्ही कर्ज फेडाल तितके तुम्हाला व्याजदर कमी लागेल म्हणजेच तुम्ही कर्जाचा अवधी कमी केला तर तुमचे व्याज सुद्धा कमी होईल. तसं तर तुम्हाला या कर्जावर दहा ते बारा टक्के व्याज आकारण्यात येते. जे की पर्सनल कर्जाच्या मानाने खूपच कमी आहे.
जर तुम्हाला एलआयसी चे पॉलिसीवर कर्ज काढायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता आणि ऑफलाईन चा पर्याय सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असेल. जर तुम्हाला ऑफलाइनच्या पर्यायाने कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला जवळच्या एलआयसी शाखेची संपर्क साधावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला कर्ज मागणी फॉर्म भरावा लागेल. त्यासोबत जरुरी कागदपत्र जोडून तो फार्म तुम्हाला अधिकाऱ्यास द्यावा लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाच ते सात दिवसात कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये टाकली जाईल.
ऑनलाइन प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल.
- नंतर तुम्हाला ऑनलाईन लोन या ऑप्शनवर क्लिक करा.
- ऑनलाइन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर री डायरेक्ट होईल.
- त्यानंतर तुम्हाला कस्टमर पोर्टल या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड आणि जन्मतारीख इत्यादी माहिती भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया पूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करावे लागेल. यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर लोणची रक्कम टाकण्यात येईल.