Maharashtra election news महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार- बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला आता सुरुवात केली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपल्या विजयाचे दावे करत आहेत. त्यामध्ये महाविकासागरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीही 180 जागांवर निवडून येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की जवळजवळ आमच्या 120 जागावर सहमती झाली असून अशी माहिती देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की राज्यांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगितल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सणासुदीचे दिवस असल्यामुळे तूर्त जागा वाटपाची चर्चा थांबवली असून अनंत चतुर्दशी झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन जागावाटप देखील निश्चित होणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.
महाविकास आघाडीमध्ये शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष असल्याने आतापर्यंत जागा वाटपाचे तीन फेऱ्या झाल्या असून उर्वरित जागावाटप हे गणेशोत्सव नंतर होणार असल्याचे देखील कळत आहे.
राज्यात तिसऱ्या आघाडी विषयी बाळासाहेब थोरात यांनी विचारले असता त्यांनी भाजपवर थेट आरोप केला असून मतांचे विभाजन करून भाजप विजय मिळवू पाहत आहे. भाजपाचे राजकारण देखील अशाच प्रकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने अनेक वर्ष असंच राजकारण केलं असून आता थेट महाविकास आघाडी आणि भाजपा अशी लढत होणार असून यामध्ये महाविकास आघाडीचे सरशी होईल असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे देखील प्रमाण खूप वाढले आहे तसेच प्रशासकीय प्रश्न आहेत, माहिती मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असून सर्व जनता हे सर्व पाहत असताना महाविकास आघाडीचे पारडे जड असणार हे निश्चित आहे असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.