Maharashtra gov. आता लवकरच आईच्या नावाचा सातबारा निघणार स्त्री सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आणि सास्कृतिक वैभव असलेले राज्य म्हणून ओळखले जाते इथे स्त्री आणि पुरुष दोघेही समान मानले जातात. असाच स्त्री संबंध म्हणून महाराष्ट्र सरकारने यापुढे उताऱ्यावर आईचे नाव येणार असल्याचे जाहीर केले आहे. स्त्री सन्मानासाठी ही गोष्ट अत्यंत उल्लेखनीय असेल. कारण भारतामध्ये शेतीप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीचा तिचा शेतीमधील सहभाग अत्यंत वाखण्याजोगा आणि जास्त प्रमाणात आहे. स्त्री शिवाय शेती ही शक्य नाही.
महाराष्ट्र सरकारने स्त्री सन्मानासाठी नेहमी घेतला असून त्यासाठी विविध योजना देखील त्यांनी सादर केले आहेत. स्त्री शिक्षणाचा पाया देखील महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला आहे. स्त्रीच्या सन्मानासाठी विविध कागदपत्रांमध्ये सुद्धा आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. या धर्तीवर भुमिअभिलेखने सुद्धा आईचे नाव सातबारा उताऱ्यावर बंधनकारक केले असून एक नोव्हेंबर पासून याची अंमलबजावणी चालू होईल.
महाराष्ट्र मध्ये एक मे 2024 नंतर त्यांचा जन्म झाला आहे त्यांचे नावे जमीन करताना खरेदी करताना संबंधिताचे आईचे नाव सातबारावर नोंदवणे बंधनकारक केले गेले आहे. यावेळी वडिलांचे नाव नोंदवणे हे बंधनकारक नसणार आहे.
पुढील काळामध्ये याची व्याप्ती वाढून फेरफार वर देखील आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर विवाहितांना वडिलांचे किंवा पतीचे नाव नोंदवणं याची मुभा असेल. ही प्रक्रिया राज्य सरकारने मंजूर दिल्यानंतर पुढील काळात सुरू होईल.
राज्य सरकारने महिलांसाठी सन्मान म्हणून विविध योजनांना सुरुवात केली असून त्यामध्ये एसटीमध्ये 50 टक्के आरक्षण तसेच माझी लाडकी बहीण योजना ही देखील समाविष्ट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये असे वार्षिक 18 हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत असून याची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा लाभ सर्व पात्र महिलांनी घ्यावा असे सरकारच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा 👇
Mumbai Dabewala महाराष्ट्र सरकारचं मुंबईच्या डबेवाल्यांना गिफ्ट
Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेतील अजून एक गैरप्रकार
Election commission of India केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर..