Maharashtra weather alert महाराष्ट्रात कुठे अलर्ट तर कुठे पावसाची उघडीप 

Maharashtra weather alert महाराष्ट्रात कुठे अलर्ट तर कुठे पावसाची उघडीप

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. भारतीय हवामान खाते आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून हवामान अंदाज विषयी पुढील माहिती पाहूयात.

पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा बसणार असून जोरदार सरांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने त्या भागातील लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रामधील इतर भागाचा विचार करत झाल्यास कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र मध्ये देखील विजांच्या कडकडेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केले आहे.

तसेच इतर जिल्ह्यातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाचा विचार करायच्या झाल्यास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

आज पासून पाऊस विश्रांतीवर जाणार असून तो 27 सप्टेंबर नंतर पुन्हा महाराष्ट्र मध्ये जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात रिमझिम पावसाची देखील शक्यता आहे.

यावरती राज्याच्या पाणीसाठा गेल्यावर्षी समाधानकारक वाढ झाली असून राज्यात पावसाचे प्रमाण देखील अत्यंत चांगले असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाण्यासाठी देखील प्रचंड वाढ झाली असून राज्यात पिण्याच्या पाण्यासह सर्व चिंता मिटल्या आहेत.

Leave a Comment