Manoj jarange सरकारने आरक्षण न दिल्यास याला जबाबदार देवेंद्र फडणवीस- मनोज जरांगे
मराठा आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसले असून मराठवाडा क्रांती दिनाच्या दिवशी ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आताही सरकारला दिलेली शेवटची संधी असेल असा इशारा देखील त्यांनी सरकारला जालन्यामधून दिला आहे. मराठा समाज हा आरक्षणासाठी कधीही राजकारण करत नाही जर तुम्हाला राजकारण करू नये असे वाटत असेल तर तुम्ही आरक्षण देऊन टाका असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले. मागच्या आंदोलनापर्यंत सरकार आमची दखल घेत होतो परंतु.. आता तुम्ही दखल घ्या अथवा नाही घ्या परंतु मी उपोषणावर ठाम असून जर सरकारने आरक्षणाला विरोध केला तर याच्या मागे देवेंद्र फडणवीसच असतील असा टोला देखील त्यांनी लावला.
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की आजपासून मी राजकारणाविषयी एक शब्द देखील बोलत नाही राजकारणाच संबंध देखील नाही येणाऱ्या विधानसभेचे सुद्धा आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु सरकारने आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी. मी फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच उपोषणाला बसलो आहे. राजकारणाशी आम्हाला काही संबंध नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने नुकताच धनगर आरक्षणाविषयी जीआर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत मनोज जरंगे पाटील यांनी केला असून. सरकारने एक चांगली गोष्ट केली असल्याचे देखील म्हटले आहे. त्याचीही मागणी फार पूर्वीपासून आहे सर्व धनगर समाज बांधवांनी त्यांच्या आंदोलनाला एक जुटता दाखवून पंढरपूरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धनगर आरक्षण संबंधी मोठा निर्णय लवकरच जीआर काढणार- मुख्यमंत्री
बारामतीकरांना आदिवासी खेळाडूंचे यश दिसत नाही का कविता राऊत यांची सुप्रिया सुळेंवर टीका
मला मुख्यमंत्री व्हायचं नाही- उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलंअ