Mumbai Dabewala महाराष्ट्र सरकारचं मुंबईच्या डबेवाल्यांना गिफ्ट
मुंबईमधील डबेवाले एक देश विदेशामध्ये सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असून त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारने जाहीर केली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांना त्यांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून 500 चौरस फुटापर्यंत घर मिळणार असल्याचे राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच चर्मकार समाजाला देखील या घराचा लाभ होणारा आहे असे देखील या पत्रकात नमूद केले आहे.
लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला असून यातीलच ही योजना आहे असे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला असून मुंबईच्या डबेवाल्यासाठी म्हाडाच्या मदतीने ही घरे बांधली जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे. चर्मकार समाजाला याच लाभ मिळणार असून 500 चौरस फूट घराची किंमत ही 25 लाख रुपये असणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुंबईच्या डबेवाले यांची संघटनांची सकाळी बैठक झाली त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. देवेंद्र फडणीस यांनी यापूर्वीच सभागृहात ही घोषणा केली होती. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतच दगडांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असताना ही घोषणा झाली आहे.
या बैठकीमध्ये विविध समाजातील तसेच डबेवाले संघटनेचे अध्यक्ष देखील आणि चर्मकार संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. सकाळी झालेल्या बैठकीतून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
योजनेच्या माध्यमातून मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12000 घरांची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी जागा प्रियंका होम्स रियालिटी कडून देण्यात आली आहे. यासाठी एकूण 30 एकर जागेची आवश्यकता असेल. मुंबईतील नमन बिल्डर यांच्याकडून या घरांचे बांधकाम केले जाणार असून ते नाना तोटा या धरतीवर काम करण्यात करणार आहेत यामुळे 25 लाखात डबेवाल्यांना घर मिळत असल्याचे बोलले जात आहे.
येणाऱ्या तीन वर्षांमध्ये ही घरे बांधून पूर्ण होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या बैठकीमध्ये सांगितले आहे.
हे सुध्दा वाचा 👇
Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेतील अजून एक गैरप्रकार
Election commission of India केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर..
Kavita Raut धावपटू कविता राऊत नाराज, अर्थ खात्यावर ओढले ताशेरे.