Nilesh Rane निलेश राणे 19 वर्षानंतर शिवसेनेमध्ये परतणार का?
महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा(Assembly) निवडणुकीत मिळवण्यासाठी नेत्यांची या पक्षातूनही दुसऱ्या पक्षात जाण्याची घाई असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. यादरम्यान निलेश राणे यांच्या संदर्भात एक बातमी आली असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेची फारकत घेत शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांची दोन्ही मुलं देखील भाजपामध्ये दाखल झाली. आता नारायण राणे हे भाजपमध्ये केंद्रीय मंत्री असून त्यांची मुले देखील भाजपामध्ये आहेत. 19 वर्षानंतर निलेश राणे हे शिवसेनेमध्ये परतण्याचे खात्रीलायक वृत्तानुसार बातमी आली आहे.
नारायण राणे यांचे घराणे कोकणामध्ये मातब्बर घराणे मानले जाते. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली असल्याचे कळत आहेत. यावरून कुडाळमध्ये शिवसेनेचे निलेश राणे हेच उमेदवार असणार की दुसरे कोणी असणार हे लवकरच कळेल.
कुडाळमध्ये ठाकरे गटाचे सध्याचे आमदार वैभव नाईक हे आहेत. शिवसेना मध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. कुडाळ हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटावा यासाठी प्रयत्न आहेत. परंतु भाजपा देखील या मतदारसंघासाठी इच्छुक आहे. नारायण राणे हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मुलाला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या भेटीसाठी वाढल्या आहेत.
भाजपाला ही जागा मिळणे अवघड असल्याचे दिसत आहे त्यामुळे निलेश राणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिंदे गटाच्या वतीने निवडणूक लढवू शकतात. 2014 सालच्या विधानसभा निवडणूक मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मध्ये सुद्धा नाईक विरुद्ध राणे हा पारंपरीक संघर्ष पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला कार्यकर्त्यांना हा ‘मंत्र’.. मित्र जिंकले तर..
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? त्यांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ नेत्याचा पक्षाला राम राम?
Maharashtra Election news: महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार