PM Kisaan Big Update : पीएम किसान मोठी बातमी इतक्या शेतकऱ्यांना मिळणार नाही 19 वा हप्ता 

 

PM Kisaan Big Update : पी एम किसान सन्मान निधी बाबत एक मोठी आहे भारत सरकारने जारी केली आहे. पी एम किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थी संकेत दिवसेंदिवस वाढ होत असून नवीन नोंदणी देखील चालू आहे. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून मासिक पाचशे रुपये चा लाभ घेत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. सरकारने 19 व्या हप्तत्याची तयारी सुरू केली असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत.

Pm Kisan Nidhi new update: पीएम किसान निधी ही योजना शेतकरी विकासाकरता मोठी उपयुक्त होत असल्याचे दिसत आहे. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सरकारने 19 व्या हप्त्याची तयारी सुरू केली असून, जवळपास अंदाजे 3. 10 कोटी च्यावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार नाही असे बोलले जात आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी अजूनही सरकारी आदेशांचे पालन केलेली दिसून येत नाही. भारत सरकारने या योजनेसाठी पारदर्शकता आणण्यासाठी नियम अत्यंत कडक केलेली असून वेळोवेळी केवायसी आणि भूमी पडताळणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या गोष्टी न केल्यामुळे शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान ठाणे येथून ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 9. 2 कोटींच्या वरती शेतकऱ्यांना दोन-दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जारी केले होते. त्यावेळी मध्ये सुद्धा जवळपास 2.70 कोटी शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे याचे कारण म्हणजे त्यांनी सरकारी आदेशांचे पालन केलेले नाही.

या दिवशी येणार 19 वा हप्ता

मागील सरकारी माहितीनुसार दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात येतात अठरावा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रान्सफर केला असल्यामुळे 19 वा हप्ता हा लागलीच जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊ शकतो असे बोलले जात आहे अजूनही सरकारी आदेशानुसार कोणतीही तारीख ठरवण्यात आलेली नाही.

जर तुम्हाला 19 हप्त्याच्या  लाभापासून वंचित राहायचे नसेल तर तुम्ही ईकेवायसी आणि भूमी सत्यता पडताळणी आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी  संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Leave a Comment