PM Kisan शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 18 वा हप्ता
18 installment शेतकऱ्यांना एक आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार महिन्यांनी दोन हजार रुपये जमा केले जातात. वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची ही योजना असून मासिक पेन्शनच्या स्वरूपात पाचशे रुपये याप्रमाणे त्यांची आकारणी केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 हप्ते जमा केले असून अठराव्या हप्त्याची तारीख ही 5 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे.
पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरून ही तारीख जाहीर करण्यात आली असून काही नवरात्रीच्या काळामध्ये ही शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट असणार आहे वार्षिक सहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतात हे पैसे शेतकऱ्यांच्या डीबीटी द्वारे डायरेक्ट खात्यामध्ये टाकण्यात येत असतात.
परंतु काही शेतकऱ्यांना हे पैसे मिळवण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे पडताळणी करून इ केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचा मार्ग मोकळा होतो. लाभार्थी शेतकरी स्वतः सीएससी सेंटरच्या माध्यमातून आपली केवायसी करून घेऊ शकतात.
ज्या शेतकऱ्यांनी एक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना हा लाभ मिळवण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एक केवायसी करून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये असे सरकारद्वारे निवेदन करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्वारे ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी डीबीटी द्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असल्याने सरकारच्या मिळणाऱ्या निधीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला बाळा बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Amit Shah: यांचा पक्षच मुळापासून संपवून टाकायचा आहे अमित शहा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर कडाडले
विठूरायाच्या सुलभ दर्शनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद, दर्शनरांगेसाठी 129 कोटी रुपये मंजूर
30 September 30 सप्टेंबरला मिळणार लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता.