Post Office Bharati: भारतीय पोस्ट विभाग भरती

Post Office Bharati: भारतीय पोस्ट विभाग भरती

भारतीय पोस्ट विभागात कुशल कारागीर या पदासाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या पदासाठी आफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकता.

भारतीय पोस्ट खात्यामध्ये काम करून इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. या अंतर्गत मेकॅनिकल मोटर विकल , वेल्डर, टायर मॅन, टीम स्मिथ, पेंटर इत्यादी पदासाठी भरती आयोजित केली आहे. 12 जुलैपासून अर्ज करण्याची सुरुवात असून शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट आहे.

आवेदन शुल्क

या भरतीसाठी खुलावर्ग, ओबीसी ,ई डब्ल्यू एस इत्यादी वर्गासाठी शुल्क हे शंभर रुपये ठेवण्यात आले आहे, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आयोजन शुल्क आणि निशुल्क आहे. उमेदवारांना फॉर्म ही भारतीय पोस्टल ऑर्डर च्या माध्यमातून भरावी लागणार आहे

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष आहे. आरक्षित वर्गासाठी वयाच्या मर्यादेमध्ये सूट देण्यात आले आहे.

पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराचे मान्यता प्राप्त बोर्ड मधून आठवी पास होणे आवश्यक आहे तसेच संबंधित एकही कुठल्यातरी क्षेत्रामध्ये एक वर्षाचा अनुभव आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय पास होणे आवश्यक आहे.

निवडप्रक्रिया

पोस्ट भरती मध्ये उमेदवारांची निवड ही त्यांच्या स्किल टेस्ट मधून, कागदपत्र पडताळणी मेडिकल तपासणी याच्या आधारावर केली जाईल. यामध्ये मेकॅनिकल मोटर वाहन या पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स होणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये वेतन देण्यात येईल

आवेदन प्रक्रिया

भारतीय डाक विभागाच्या पोस्ट भरतीसाठी उमेदवारांनी फॉर्म आहे ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. उमेदवारांनी या पदासाठी फार्म भरताना ऑफिशियल  नोटिफिकेशन खात्रीपूर्वक वाचून आवेदन फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

त्या फॉर्ममध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून त्याबरोबर कागदपत्र जोडून, फोटो आटेस्टेड करून फॉर्म सबत लावायचा आहे तसेच फोटोच्या रकान्यात फोटो व्यवस्थित लावून त्यावर सही करावी. त्यानंतर विहित पत्त्यावर एका लिफाफ्याच्या माध्यमातून 10 ऑगस्ट या सायंकाळी पाच वाजता या मुदतीच्या आधी पोज होईल अशी व्यवस्था करावी.

ऑफिशियल वेबसाईट-www.indiapost.gov.in

 

Leave a Comment