Samruddhi mahamarg समृद्धी महामार्ग हा पुण्यापर्यंत येणार.. मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा
Samruddhi mahamarg समृद्धी महामार्ग बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. याला मार्गाचे लवकरच विस्तारीकरण होऊन हा मार्ग पुण्याला जोडण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. त्यामुळे या महामार्गाची लांबी अजून वाढण्याची शक्यता आहे. हा मार्ग पुण्याला जोडल्यामुळे एक सांस्कृतिक राजधानी चा शहर समृद्धी महामार्गाच्या कक्षेत येणार आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि शिरूर मध्ये प्रस्तावित असलेला राज्य महामार्ग याची लांबी 53 किलोमीटर असून हा सहा पदरी उड्डाण मार्ग नगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. आता हा महामार्ग छत्रपती संभाजी नगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या महामार्गाला एकूण खर्च 9565 कोटी एवढा अपेक्षित आहे. याची लांबी ही अडीचशे किलोमीटर इतकी असणार आहे.
या महामार्गाची सुरुवात ही पुणे जिल्ह्यातील केसनंद येथून होणार असून त्यासाठी 7 515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती केली जाणार आहे.
छत्रपती संभाजी नगर ते पुणे या प्रस्तावित महामार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देताना राज्य मंत्रिमंडळाने पुणे ते छत्रपती संभाजी नगर या महामार्गाची घोषणा केली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.