Sharad Pawar शरद पवार यांचे मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संकेत

Sharad Pawar शरद पवार यांचे मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संकेत

Maharashtra election update: महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर पर्यंत असल्याने त्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. अजून त्यांचे जागा वाटपाचे घोडे अडलेले आहे.

महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याच्यात धरतीवर उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी केली होती की आधी मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करा आणि नंतर निवडणूकीत लढवणे बाबत विचार करू.

परंतु महाविकासाकडे मधील प्रमुख नेते माननीय शरदचंद्र पवार यांनी स्पष्ट संगीत दिले होते की महाविकास आघाडी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करणार नाही. त्यानंतर अंतर्गत मतभेद दिसून आले.

शरदचंद्र पवार यांनी कोल्हापूरमध्ये सांगितले की आदी निवडणूक होऊ द्या मग ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. याचाच अर्थ असा होतो की ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार. संख्याबळावरून मुख्यमंत्री ठरवला जाईल असे संकेत शरदचंद्र पवार यांनी दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावरून असे स्पष्ट होते की महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या आधी उमेदवार जाहीर करणार नाही निवडणूक झाल्यानंतरच जागांच्या निकषावर मुख्यमंत्री या पदाची घोषणा केली जाईल.

परंतु हा निर्णय एक उद्धव ठाकरे साहेबांना झटका देणारी आहे. गेल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीप्रमाणे याही वेळी मुख्यमंत्री पदाची आशा त्यांना असू शकते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील सर्व आमदारांना माननीय मुख्यमंत्री हे उद्धव साहेब व्हावे असे वाटत आहे.

मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा पवार साहेब जो उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देईल. परंतु जाणकारांच्या म्हणण्यानुसार हे विधान खोचकपणाने केलेले आहे असे मानले जात आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितले होते की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. ते जनतेच्या मनातील भावना आहे.

तिकडे महायुती ने देखील मुख्यमंत्री पदासाठी चेहरा जाहीर केलेला नाही.भाजपामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल.यावरून असे दिसते की सर्वांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार व्हावे.

 

 

Leave a Comment