Weight loss तुपाचे सेवन केल्याने वजन वाढते का? चला पाहूया…
Weight loss लठ्ठपणाही जागतिक समस्या निर्माण झाली आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या प्रचंड समस्या जाणवतात. अनेकजण यामध्ये त्रस्त असून सर्वजण काही ना काही उपाय करत असतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तूप खावे किंवा नाही त्याचे परिणाम शरीरावर काय होतात हे या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
Weight loss पूर्वीसारखी जीवनशैली सध्या राहिलेली नसून जीवनशैली पूर्णपणे बदललेले आहे. खाण्याचे अयोग्य वेळा, कामाचा ताण, धावपळ, आणि प्रचंड लोकप्रिय असलेले जंक फूड खाण्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याचे निदर्शनास आले आहे. आशा खान्यामुळे लठ्ठपणा प्रचंड वाढत आहे.
हा वाढलेला लठ्ठपणा weight loss कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करत असून व्यायाम तसेच प्राणायाम इत्यादी मार्गाचा देखील अवलंब करत आहेत. तसेच तेलगट आणि तूप असलेले पदार्थ खाण्यापासून लोक दूर राहत आहेत. परंतु तुपाचे सेवन केल्यानंतर वजन वाढते का हे तज्ञांच्या मते जाणून घेऊयात.
लठ्ठपणा किंवा वजन वाढणे ही जागतिक समस्या होऊन बसली आहे जागतिक आरोग्य आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. लठ्ठपणा दूर करण्यासाठी लोकांनी व्यायामाचा आधार घेतला आहे. तसेच प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम आणि ट्रिम असावे यामुळे प्रत्येक जण याबाबत मध्ये प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून काही लोक डायटिंगचा सुद्धा आधार घेत असतात. तेलयुक्त आणि तुपाचे पदार्थ यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तू न खाल्ल्याने लठ्ठपणा दूर होतो किती जणांना माहिती असेल.
खरोखर साजूक तुपामुळे वजन वाढते का हे तज्ञांची मते जाणून घेऊयात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही याउलट ते कमी होण्यास मदत होते. तुपाचे जर नियंत्रित सेवन केले तर किंवा कमी प्रमाणात खाल्ले तर ते आपले पचनास सुधार करते आणि चयापचयाची प्रक्रिया वाढवते. त्यामधील असलेले एम सी टी हा घटक चरबी जाण्यास मदत करत असतो. जर आपण तू खाल्ले तर आपले पोट हे भरल्यासारखे वाटते त्यामुळे भूक कमी प्रमाणात लागू शकते. भूक न लागल्यामुळे आपल्या खाण्यावर नियंत्रण येते त्यामुळे सध्या वापरात असलेले रिफाइंड तेल आणि बटर पेक्षा तूप फायदेशीरच असल्याचे निदर्शनास आले आहे.
परंतु या तुपाचे खाण्याचे प्रमाण देखील नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कमी प्रमाणात तूप फायदेशीर ठरते परंतु जास्त जर खाण्यात आले तर ते शरीरात कॅलरीज वाढवून आपल्या वजनात वाढ करू शकते. तुम्ही दिवसाला एक चमचा तूप खाणे एकदम योग्य आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचे झटत असाल तर एक चमचा तूप खाणे केव्हाही चांगले आहे. बदललेले जीवनशलीमुळे वजन कमी करण्यासाठी आपण तुपाचा नियंत्रित आहार घेणे तितकेच फायदेशीर ठरणार आहे असे तज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे आपण आहारामध्ये तुपाचा नियंत्रित वापर करू शकतो हे यावरून सिद्ध होते.